Breaking News

वर्धा – पोषण टँकर एप्सला आयटकचा विरोध  अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध ठिकाणी पावसात आंदोलन

Advertisements

केंद्र सरकारने पोषण टँकर एँप्स मराठीत करा अन्यथा एँप्सचे कामबंद मागणीला घेवून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या आवाहनानुसार आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्यावतिने १० जून २०२१ रोजी वर्धा तालुक्यात विविध ठिकाणी भर पावसात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात *कोरोणा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून* अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्ह्यात १० ते २१ जून या कालावधीत विविध तालुक्यात आंदोलन होणार असून हा पहिला दिवस होता.

Advertisements

*केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून व कुपोषित बालके आहारापासून वंचित राहण्याची शक्यता*

Advertisements

*महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मराठी ऐवजी इंग्रजीत काम करण्याची सक्ती*

*कोरोना काळातही केंद्र शासनाने लढण्याची वेळ आणल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष*

अंगणवाड्यांच्या कामकाजाची माहिती शासनाला दैनंदिन पातळीवर कळविण्यासाठी, मे २०२० पर्यंत कॅस या ऍप्स मध्ये ती माहिती भरली जात होती. परंतु मे २०२० पासून कॅसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते बंद पडले व माहिती पुन्हा रजिस्टर्समध्ये माहिती भरण्याचे आदेश आले. काही कर्मचाऱ्यांकडील जुनी रजिस्टर्स संपलेली असल्यामुळे त्यांना स्वखर्चाने नवीन रजिस्टर्स घेणे भाग पडले. या सर्व अडचणींना तोंड देत असतानाच पोषण ट्रॅकर या केंद्र शासनाच्या नवीन ऍपवर काम करण्याचा आदेश आला. परंतु त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अनेक कर्मचाऱ्यांचा शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक जणींकडे स्वतःचा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत तर त्यांच्या घरातील कुटुंबीय सामायिक रित्या वापरतात. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाईन वर्ग किंवा परिक्षा चालू असतात. त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होईलच याची खात्री देता येत नाही. शिवाय डेटा रिचार्जचे पैसे महिनोन महिने येत नाहीत. त्यामुळे पोषण ट्रॅकरसाठी खाजगी फोन वापरला जाऊ नये. शासनाने त्यांना चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल द्यावा. तसेच डेटा रिचार्जसाठीचे पैसे नियमितपणे द्यावेत अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत असा आदेश आहे त्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये देखील सर्व माहिती मराठीत भरली गेली पाहिजे. परंतु पोषण ट्रॅकर ऍपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही. इंग्रजीमध्येच सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषतः ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडी सेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. काही ठिकाणी सेविकेची जागा रिक्त असल्याने मदतनीसांना ही जबाबदारी दिली आहे. त्यांना इंग्रजी येत नाही.

लाभार्थी बालकांचा आधार कार्ड क्रमांक जोडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळून शकणार नाही अशी जाचक अट पोषण ट्रॅकरमध्ये घालण्यात आलेली आहे. आधार कार्ड नसले तरीही कुणालाही सामाजिक सुरक्षा व अन्न अधिकारापासून वंचित ठेवण्यास प्रतिबंधित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तसेच मानवी हक्कांचे हे उल्लंघन आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा खूपच चुकीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही ऍपमध्ये भरलेली माहिती सिंक होत नाही. कधी रेंज न मिळाल्याने इंटरनेट चालू नसते किंवा त्याची क्षमता कमी असते त्यामुळे माहिती अपलोड होत नाही, तर कधी सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे काम करूनही केवळ पोषण ट्रॅकमध्ये माहिती गेली नाही म्हणून मानधनात कपात करणे अन्यायकारक आहे.

सेविकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या अंगणवाडीतील मदतनीस ऑनलाईन काम करण्यास सक्षम नसल्यास जवळच्या अंगणवाडी सेविकेला त्या अंगणवाडीचा अतिरिक्त कार्यभार दिला जातो. कमी वेळामध्ये अशा अतिरिक्त अंगणवाडीची जबाबदारी पार पाडणे, म्हणजेच दुप्पट काम करणे केवळ अशक्य आहे.

वरील सर्व अडचणी न सोडवता केवळ केंद्र शासनाने दिले आहे म्हणून ते काम कोणताही साधक बाधक विचार न करता तसेच्या तसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादणे अन्यायकारक आहे. आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १९ मार्चच्या निवेदनात सर्व अडचणी नमूद करूनही शासनाने त्या सोडविण्यासाठी काहीही कृती केली नाही उलट परिक्षेत किंवा ऑनलाईन अभ्यासात गुंतलेल्या पाल्यांना त्यांचे महत्वाचे शैक्षणिक काम सोडायला लावून त्यांच्याकडून किंवा शेजार, पाजारच्या लोकांकडून किंवा सायबर कॅफेमध्ये पैसे देऊन हे काम करून घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. काही जणींनी अशा पद्धतीने काम करवून देखील घेतले. परंतु काही जणींना ते देखील शक्य झालेले नाही. या परिस्थितीत त्यांना एप्रिलचे मानधन न देण्याची व लाभार्थ्यांना आहार न देण्याची धमकी प्रशासनाकडून दिली जात आहे. *पोषण ट्रॅकर बाबतच्या सर्व अडचणी सुटेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी बाकीची सर्व कर्तव्ये पार पाडतील परंतु पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम करणार नाहीत तसेच १० ते २१ जून २०२१ या आठवड्यात राज्यातील सर्व प्रकल्पांवर तसेच जिल्हा परिषदांवर आंदोलन करून निवेदन देतील असे कृती समितीने जाहीर केले असून शासनाने वर नमूद केलेल्या तसेच नंतर उद्भवू शकणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा निर्णय मागे घ्यावा असे शासनाला कळविण्यात आले आहे.*

वंदना कोळणकर रेखा कोठेकर वनिता नाईक अरुना नागोसे शबाना खान अल्का भानसे विजया पावडे मैना उईके वंदना खोबरागडे शालू दांडेकर माला भगत सुजाता घोडे ज्योती फुलझेले रेखा जिवने अनिता भानसे मिनाक्षी म्हैसकर आशा आटनेरकर सुमन उईके सुवर्णा कोपरकर माया तितरे गोदावरी राउत दोपदी वानखेडे चंदा अतकरे शोभा बोंदरे काँ सुरेश गोसावी शारदा कांबळे सुषमा ढोक ज्योती वाघ सपना तिमांडे चैताली दारकोंडे बेबी बाराहाते शांता भारतोड माला डंभारे नम्रता वानखेडे ज्योती लाटकर मुक्ता शेवडे जिलोतमा खेडकर पुष्पा गाडेगोणे ज्योषना दौळ रंजना डफ माधूरी मुडे नलू ठाकरे साधना गोडे यांनी हातात मागणी फलक घेवून आंदोलन केले

मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधीकारी बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण व शहरी यांना देण्यात आले वर्धा तालुक्यात

सांवगी (मेघे) ग्रामपंचायत समोर सालोड ग्रामपंचायत समोर वळद पडेगांव बोरगांव मेघे ग्रामपंचायत ११.वा. बोरगाव नाका बजाज चौक वाशिवाजी चौक नागरी प्रकल्प वर्धा जि.प.समोर’, जिल्हाधिकारी कार्यालय

पंचायत समिती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा

नालवाडी सिंदी मेघे सेवाग्राम चौक वायगांव तरोडा पवनार

पिपरी वायफड उमरी मेघे तळेगाव (टा) खरागंणा गोडे इत्यादी करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *