Breaking News

पुणे

बिबट्याच्या भीतीने शाळेला दुपारनंतर सुटी.. वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. वनविभाग व रेस्क्यू …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद : देवेंद्र फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस …

Read More »

बिबट सफारी रद्द,अजित पवारांना धक्का…वाचा

विश्व भारत ऑनलाईन : बारामतीमधील प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर शिंदे सरकारने रद्द केली आहे. ही बिबट सफारी आता जुन्नरला होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत. नेमके प्रकरण काय? …

Read More »

दहावीच्या परीक्षेबाबत पुढील आठवड्यात निर्णय

पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दल चिंता वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल.’’ पुणे : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता, शिक्षण सचिव यांच्याशी चर्चा करून पालकांना विद्यार्थ्यांबाबत काळजी वाटणार नाही आणि न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि …

Read More »

करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …

Read More »

ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन

पुणे : दुभंगून जाता जाता, आताच अमृताची बरसून रात्र गेली अशा गझलांचे ज्येष्ठ संगीतकार रवी दाते (वय 81) यांचे मंगळवारी सायंकाळी आजाराने निधन झाले. दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते कनिष्ठ बंधू होते. रवी दाते यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांची कोरोनासंबंधी चाचणी करण्यात आली होती; पण ती निगेटिव्ह असल्याचे सूत्रांनी …

Read More »