Breaking News

भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या केबल ब्रिज दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार मोहन भाई कुंदरिया यांचे नातेवाईकही पूल कोसळला तेव्हा तिथे होते.

खासदार मोहन भाई कुंदरिया म्हणाले, ‘या घटनेत माझ्या भाऊजींच्या भावाच्या ४ मुली, ३ जावई आणि ५ मुलं यांचा मृत्यू झालाय. हे खूप वेदनादायी आहे.’

मोहनभाई कुंदरिया हे राजकोटचे खासदार आहे. ‘मी सायंकाळपासून येथे आहे. १०० पेक्षा जास्त लोकांचे मृतदेह मिळाले आहेत.’ पूल खुला करण्याची परवानगी न घेतल्याच्या मुद्द्यावर खासदार कुंदरिया म्हणाले, ‘ज्याची चूक असेल, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. कुणालाही सोडणार नाही.’

About विश्व भारत

Check Also

३५८ पदावर नौकरी लावून देण्यासाठी लाखोंचा व्यवहार : CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची …

७ महिन्यांत २५ लग्न करणारी ‘लुटेरी दुल्हन’!

‘लुटेरी दुल्हन’ ही सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन करून लग्न झाल्यावर काही तासांतच मौल्यवान वस्तूंनी भरलेली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *