Breaking News

विदर्भाला हुडहुडी ; राज्यातही पाच दिवस कडाक्याची थंडी

Advertisements

राज्यभरात थंडीची हुडहुडी सुरू झालीय. येत्या काही दिवसात विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पारा घसरून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि कोकण किनारपट्टीलाही कडाक्याच्या थंडीचा इशारा मिळालाय.

Advertisements

विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वातावरण कोरडे असून, पुढील काही दिवस या ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काल विदर्भातील अमरावती (10.8°C), यवतमाळ (11.05°C) आणि नागपूर(11.06 °C) या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हीच परिस्थिती पुढील पाच दिवस राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Advertisements

शहरे व तापमान

नाशिक (10.4°C), पूणे (11.03), औरंगाबाद (11.1°C), कोल्हापूर (16.04°C), नांदेड(14°C), जळगाव (13°C), अहमदनगर (13.08°C) या ठिकाणीही कमी तापमानाची नोंद झाली असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *