Breaking News

आजपासून थंडीचा कडाका जाणवणार

Advertisements

थंडीचा प्रभाव वाढत आहे. हिमालयीन भागात एक डिसेंबरपासून पश्चिमी चक्रावात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. परिणामी राज्याच्या सर्वच भागात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान बुधवारी राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या 3.3 अंश कमी झाला आहे.

Advertisements

हवामान विभागानुसार, 2 आणि 3 डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात बुधवारी सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे 11.9 अंश एवढी झाली. मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यात आकाश काहीसे ढगाळलेले असले तरी किमान तापमानसुद्धा सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्रीने खालावलेलेच असेल, अशी शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। धुएं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *