Breaking News

महागडा घटस्फोट : महिन्याला खावटीचे 1 कोटी 65 लाख द्यावे लागणार

Advertisements

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झालाय. किमने २०२१ मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

Advertisements

आता यावर कोर्टाने निकाल दिला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही त्यांच्या मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने घटस्फोटात किमला कान्ये वेस्ट किती रक्कम देईल, याबद्दल आदेशही दिले आहेत.

Advertisements

किमने मार्च २०२२ मध्ये आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच तिने तिच्या नावातून ‘वेस्ट’ काढून टाकलं होतं.

संपत्तीचे विभाजन?

दोघांमध्ये संपत्तीचे विभाजन आणि मुलांचा ताबा यावरून वाद निर्माण झाला होता. मंगळवारी हा वाद न्यायालयाने निकाली काढला. न्यायालयाच्या आदेशानुसार, मुलांच्या हिताचे मोठे निर्णय घेताना दोघांनाही एकमेकांशी बोलावे लागेल. तसेच मुलांची सुरक्षा, शाळा आणि कॉलेजचा खर्च किम आणि कान्ये या दोघांनाही करावा लागेल.

रक्कम किती?

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मुलं जास्त वेळ किमबरोबर राहणार आहेत. तसेच कान्ये वेस्टला मुलांच्या खर्चासाठी महिन्याला २ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.६५ कोटी रुपये द्यावे लागतील. किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांना चार मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी नॉर्थ ही ९ वर्षांची आहे. ६ वर्षांचा मुलगा सेंट, ४ वर्षांचा शिकागो आणि ३ वर्षांचा मुलगा सालम आहेत. दोघांचंही लग्न ९ वर्षे टिकलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील आंभोरा ब्रिजचे अमेरिकेतील लॉस एंजिल्सचे काय आहे कनेक्शन?वाचा

विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्‍याचा लौकिक आहे. याच आंभोऱ्यात आंभोरा केबल स्टेड …

धोखेबाज चीन और पाकिस्‍तान गठजोड़ पर भारत की पैनी नजर, रहना होगा हर वक्‍त चौकन्‍ना-एडमिरल करमबीर सिंह का बयान 

धोखेबाज चीन और पाकिस्‍तान गठजोड़ पर भारत की पैनी नजर, रहना होगा हर वक्‍त चौकन्‍ना- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *