Breaking News

37 प्रकारचा असतो कॅन्सर : जास्त पसरल्यास सर्वच धोकादायक…6 पैकी एकाचा मृत्यू

कॅन्सर हा एक जीवघेणा व गंभीर आजार आहे. कॅन्सर हे नाव ऐकूनही अनेकजणांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला कॅन्सरबद्दल वेगळी माहिती देणार आहोत. तुम्हाला माहितीये का, किती पद्धतीचे कॅन्सर असतात? आणि कोणता कॅन्सर सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतो.

कॅन्सर म्हणजे काय?

मॉडर्न लाईफस्टाईलमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. या आजारांमध्ये कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. मुळात आपल्या शरीरात अनेक वाईट पेशी असतात. ज्यावेळी शरीर नवीन पेशी बनवतं, त्यावेळी जुन्या पेशी खराब होतात. कॅन्सर शरीरात शिरतो तेव्हा लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशींमधला समतोल संपूर्णपणे बिघडतो. परिणामी पेशी खराब होऊन या पेशींचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं.

कॅन्सरला जगातील सर्वात गंभीर आजार मानलं जातं. जगभरात होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये कॅन्सर हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, जगभरात साल 2020 पर्यंत 6 मधील एक व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे झाला आहे. संशोधकांनी कॅन्सरच्या आजारावर अनेक वर्ष रिसर्च केला. यामध्ये कॅन्सरचं मुख्य कारण हे म्युटेशन आणि डीएनए सेल्समध्ये होणारे बदल आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जवळपास 33 टक्के कॅन्सरने होणारे मृत्यू हे तंबाखू, दारू, उच्च बॉडी मास इंडेक्स, कमी फळं आणि भाज्यांचं सेवन तसंच शीरीरिक एक्टिव्हिटी न करण्याचं कारण आहे.

कॅन्सरचे प्रकार

*अपेंडिक्स कॅन्सर
*ब्लॅडर कॅन्सर
*ब्रेन कॅन्सर
*हाडांचा कॅन्सर
*ब्रेस्ट कॅन्सर
*सर्व्हायकल कॅन्सर
*कोलन किंवा कोलोरेक्टल कॅन्सर
*डुओडनल कॅन्सर
*कानाचा कॅन्सर
*इंडोमेटरियल कॅन्सर
*इसोफेजियल कॅन्सर
*हृदयाचा कॅन्सर
*गॉल ब्लॅडर कॅन्सर
*किडनीचा कॅन्सर
*लॅरिंजियलचा कॅन्सर
*ल्यूकेमिया
*ओठांचा कॅन्सर
*लिवर कॅन्सर
*फुफ्फुसांचा कॅन्सर
*लिंफोमा
*मेसोथेलियोमा
*मायलोमा
*तोंडाचा कॅन्सर
*ओवेरियन कॅन्सर
*पेनक्रियाटिक का कैंसर
*पिनाईल कॅन्सर
*प्रोस्टेट कॅन्सर
*रेक्टल कॅन्सर
*स्किन कॅन्सर
*छोट्या आतड्यांचा कॅन्सर
*स्पलीन कॅन्सर
*पोटाचा कॅन्सर
*टेस्टिक्युलर कॅन्सर
*थायरॉईड कॅन्सर
*यूटेरिअन कॅन्सर
*वजायनल कॅन्सर
*वुल्वर कॅन्सर

About विश्व भारत

Check Also

20 साल की लड़की को हेयर कलर पड़ा भारी : किडनी में सूजन   

20 साल की लड़की को हेयर कलर पड़ा भारी : किडनी में सूजन टेकचंद्र शास्त्री: …

मधुमेह सुगर नियंत्रण के लिए रामबाण है नाशपाती फल 

मधुमेह सुगर नियंत्रण के लिए रामबाण है नाशपाती फल   टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *