Breaking News

रामभक्तांविरोधात वनविभागाची पोलिसात तक्रार

Advertisements

हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीवर रामभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

प्रकरण काय आहे?

Advertisements

जगातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून आलापल्ली वनविभागातील सागवान ओळखल्या जाते. ब्रिटनपासून नव्या संसद भवनासाठी येथील सागवानचा वापर करण्यात आला आहे. आता हेच सागवान अयोध्येत राम मंदिराचे प्रवेशद्वार आणि गर्भगृहाची शोभा वाढवणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहात आलापल्ली येथील रामभक्तांनी २६ मार्च रोजी काष्ठपूजन केले व शहरातून शोभायात्रा काढली. दुसरीकडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी हे सागवान बल्लारपूर येथून पाठवण्यात येणार आहे, असे सांगून २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन विकास महामंडळ) आलापल्ली यांनी त्यादिवशी आलापल्ली येथील शोभायात्रा विनापरवानगी काढण्यात आली, अशी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या या कृतिविरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. एकंदरीत, राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या सागवानावरून आणि शोभायात्रेवरून श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:307) कैसे पड़ा मारुती नंदन हनुमान जी महाराज का नाम? कथा बड़ी ही रोचक है

(भाग:307) कैसे पड़ा मारुती नंदन हनुमान जी महाराज का नाम? कथा बड़ी ही रोचक है …

कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी

कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *