Breaking News

मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक : अर्धवट बेशुद्धावस्थेत

Advertisements

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना काल (२३ मे) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयाने आता मेडिकल निवेदन जारी केले आहे.

Advertisements

मनोहर जोशी यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती देण्याकरता हिंदुजा रुग्णालायने मेडिकल स्टेटमेंट जारी केले आहे. यानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी २२ मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सेमिकोमामध्ये असून त्यांचा श्वासोच्छवास सुरू आहे. तसंच मनोहर जोशी वेंटिलेटरवर नसल्याचंही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

Advertisements

“मनोहर जोशी यांची परिस्थिती चिंताजनक असून ते अर्धवट बेशुद्धावस्थेत (semi comatose) आहेत. त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,”अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

“मनोहर जोशी यांची परिस्थिती चिंताजनक असून ते अर्धवट बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.”

गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर लोकसभा निवडणुकीतील मतदान कमी झाल्याचा मुद्दा नागपूर हायकोर्टात!

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी पाच लाखांच्या अंतराने जिंकून येतील, असा दावा भाजपतर्फे केला जात …

कांग्रेस ने मोदी सरकार की 10 वर्षों नाकामयाबी को बताया ‘अन्याय काल’, सरकार गिराने से लेकर अर्थव्यवस्था को दिलाया याद

कांग्रेस ने मोदी सरकार की 10 वर्षों नाकामयाबी को बताया ‘अन्याय काल’, सरकार गिराने से …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *