Breaking News

शेतकऱ्यांना ईशारा! पेरणीची घाई करु नका : वाचा

Advertisements

राज्यातील नागरीक उकाड्याने हैराण आहेत. सूर्य प्रचंड आग ओकतोय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. नागरिकांना आता पावसाची आस लागली आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी अगदी चातका सारखी पावसाची वाट पाहायला लागले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण राज्यभरातील शेतकरी कामाला लागले आहेत. हे शेतकरी रणरणत्या उन्हात शेतीचं काम करत आहेत. कुणी शेत साफ करतंय. तर कुणी ठिबक सिंचनासाठी नळ्या अंथरत आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने कामाला लागला आहे.

Advertisements

विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंब सध्याच्या घडीला शेतात राबत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या अगदी 9-10 वर्षांच्या मुलांपासून ते शेतकऱ्याची पत्नी, सून, आई-बाबा सगळ्यांचा समावेश आहे. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. शेतातील कामं आटोपल्यानंतर शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहणार आहेत. पण हवामान विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Advertisements

हवामान विभागाचं आवाहन काय?

राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी अजून 8 ते 10 दिवस वाट पहावी लागणार आहे. अंदमानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून वर सरकला आहे. मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होणार, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली.

पुढच्या दोन आठवड्यात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. तसेच यंदा सरासरी 96 टक्के इतका पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली.

यंदाच्या पावसावर अलनिनोचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला होसाळीकर यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा

राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण राज्यभरात अवकाळी पावसाने प्रचंड त्रास दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा चांगल्या उत्पन्नाची आस असताना अचानक आलेल्या पावसाने सारी पीकं उद्ध्वस्त केली. शेतकऱ्यांच्या अगदी तोंडातील घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं.

असं असलं तरी आता शेतकऱ्यांना आगामी काळात शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. आगामी काळात भरपूस पाऊस पडो, शेतीला बहर येवो आणि आपण कर्जमुक्त होवो, असं शेतकऱ्यांना वाटतंय. त्यामुळे येत्या पावसाकडून शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार …

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *