Breaking News

ये तो होना ही था!राज्यात पाऊस लांबणीवर!

Advertisements

मोसमी पावसाचे केरळमधील आगमन १ जून रोजी अपेक्षित असते. मात्र, यंदा हवामान खात्याने सुरूवातीला वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ जूनचा मुहूर्तही पावसाने चुकवला आहे. अद्याप केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला नाही. केरळमध्ये मोसमी पावसासाठी अजूनही अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पाऊस लांबनीवर पडला आहे.वळीवाच्या पावसाने मात्र राज्यातील बहुतेक भागात हजेरी लावली आहे.

Advertisements

साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा मोसमी पावसाचा प्रवास संथगतीने सुरू आहे. केरळमध्ये ४ जूनला मोसमी पाऊस दाखल होऊन महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र मोसमी पाऊस केरळमध्ये चार ते पाच दिवस उशिरा येणार असल्याने महाराष्ट्रातही मोसमी पावसाला विलंब होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे १३ ते१५ जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *