Breaking News

चंद्रपूरमध्ये 5 जण ठार : वर्धेत महिला दगावली, गडचिरोलीत शेतात काम करताना वीज कोसळली

Advertisements

गडचिरोली :

Advertisements

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पाऊसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके (वय 54 वर्ष, राहणार महागाव) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Advertisements

वर्धा :

समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे राहणार आर्वी असं मृत महिलेच नाव आहे. पाच महिलांना विजेची आस लागली. विजेची आस लागलेल्या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली.

चंद्रपूर :

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही तालुक्यातील शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना प्रकाशझोडे आणि श्रीमती परसोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला. तर चौथ्या घटनेत गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झालाय. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी केलाय तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *