Breaking News

प्लॉट मोजणीच्या नकाशासाठी मागितली लाखांची लाच; सिटी सर्वेचे दोन भूमापक गजाआड

Advertisements

औरंगाबाद शहरातील पिसादेवी रोडवरील प्लॉटची मोजणी केल्यावर मोजणी नकाशा देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ६० हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन भूमी अभिलेख विभागाच्या भूमापकांना अटक करण्यात आली.

Advertisements

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) हडको भागात मंगळवारी (दि.२९) भूमिअभिलेख विभागात ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.

Advertisements

सचिन बाबुराव विठोरे (वय ३५) आणि किरण काळुबा नागरे (वय ४३) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांचा पिसादेवी रोडवर प्लॉट आहे. त्या प्लॉटची सरकारी मोजणी करण्यासाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार, भूमापक सचिन विठोरे आणि किरण नागरे यांनी मोजणी केली.

दरम्यान, मोजणीचा नकाशा देण्यापूर्वी त्यांनी तक्रारदार यांना एक लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच ५० हजार रुपये तत्काळ घेतले. उर्वरित ६० हजार रुपयांसाठी विठोरे आणि नागरे यांचा तक्रारदाराकडे तगादा सुरु होता. लाचेची रक्कम दिल्याशिवाय मोजणी नकाश मिळणार नाही, असे सुनावले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अशोक खरात करायचा योनी पूजा : महिलांना द्यायचा मूत्र आणि वायग्रा

भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. ज्योतिषी सांगण्याच्या नावाखाली त्याने …

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट : उपजिल्हाधिकारी गोत्यात

तीन IAS अधिकाऱ्यांनी घेतली भोंदू अशोक खरातची भेट भोंदू अशोक खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *