वय कमी कसे करता येईल, यावर संशोधन सुरु आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेले संशोधन व सिलिकॉन व्हॅलीचे टेक दिग्गजांचा फोकस सुदृढ आयुष्यासह आता वय वाढण्याचा वेग कमी करण्याकडे आहे. पेपालचे सहसंस्थापक पीटर थिएल, गुगलचे लॅरी पेज व सर्गेई ब्रिन आणि जेफ बेजोस यांनी आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.
ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमॅन यांनी रेट्रो बायोसायन्सेसमध्ये १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुदृढ व्यक्तीचे वय १० वर्षे वाढवण्याचे त्यांचे ध्येय आहे. टेक रॉयल्टीद्वारा समर्थित फर्म्सच्या मार्गदर्शनात स्टार्टअप्सचा समूह अशा औषधांवर काम करत आहे, जे वय वाढण्याचे काही पैलू हळू करण्यासह रोखू शकते. ते विचार,आहार, व्यायाम, लवकर झोपण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाप्रमाणेच (त्याशिवायही) आधीपासून उपलब्ध औषधांचा वापर करून आयुष्यमान वाढवण्यावर आधारित आहे. सिलिकॉन व्हॅलीसारखे तांत्रिक नैपुण्यसंपन्न स्थान याचे साक्षीदार होत आहेत. जगभरातील संशोधन संस्थाही यात मागे नाहीत. स्पेनची ओव्हिएडो विद्यापीठाचे कार्लोस लोपेज-ओटिन व त्यांच्या सहकाऱ्यांनी वय वाढवण्याच्या १२ लक्षणांची यादी तयार केली आहे. या सर्व गोष्टी वाढत्या वयासोबतच खराब होतात व वय वाढण्याचा वेग वाढवतात. उपचारांनी त्याला धिमे करू शकतो. जीनही या वाढत्या वयाचा वेग कमी करण्यात साहाय्यभूत ठरतात. बहुतांश जीन्समध्ये प्रकार असतात, जे एलील म्हणून ओळखले जातात. ते शरीराच्या विविध कामांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. असे विशेष जीन्स एलील्स प्रयोगांत शोधले आहेत,जे प्रयोगात्मक रूपाने आयुष्यमान वाढवण्यात महत्त्वाचे आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे जॉर्ज चर्च (बायोटेक गुरू) सांगतात, वय वाढण्याचे तपशील स्पष्ट होत असल्याने अपेक्षा आहे. लहान लहान गटात समस्येचे वर्गीकरण करण्यात संशोधक सक्षम झाले आहेत, ज्यांच्याशी वैयक्तिकरीत्या तोंड देता येईल.
कॅलरी इनटेक घटवणे लाभदायक; शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल सर्व नियंत्रणात
‘नेचर एजिंग’ संशोधनातही या विचारांना समर्थन देण्यात आले आहे. कॅलरी इनटेक घटवूनही वय वाढण्याची प्रक्रिया धिमी करता येऊ शकते. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या गटाने २१-२५ वर्षांच्या २०० तरुणांना दोन गटात विभागले. दोन वर्षांच्या संशोधनात एका गटाला २५% कमी कॅलरी देण्यात आली. दुसऱ्या गटाला सामान्य भोजन देण्यात आले. निकाल हैराण करणारे होते. कमी कॅलरी घेणाऱ्यांची तब्येत चांगली होती. नियमितपणे खाणाऱ्यांच्या तुलनेत या लाेकांमध्ये कोलेस्टेराॅल, बीपी व शुगरचे मार्कर चांगले दिसले, तर सामान्य भोजन घेणाऱ्यांमध्ये ते वाढले होते.