दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि वेगळ्या विदर्भ आंदोलनासाठी सतत झटणारे प्रकाश पोहरे यांनी आज सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास विदर्भाच्या मुद्दावर हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला. सुरक्षा करणाऱ्या पोलीस यंत्रणेनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले.
विदर्भात अधिवेशन घेण्यात येते. तरीही विदर्भाच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करते, असा पोहरे यांचा आरोप आहे.