Breaking News

स्वतःला शहाणा समजणारा वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड यांनी वाघाचे नख आपण गळ्यात ठेवत असल्याचे विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा उपवनसंरक्षक(DCF) सरोज गवस यांनी याला दुजोरा दिला.

काय म्हणाले आमदार गायकवाड?

१९ फेब्रुवारी रोजी स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांनी, मी १९८७ साली वाघाची शिकार केल्याचे विधान केले होते. तसेच वाघाची शिकार करून वाघाचा दात गळ्यात घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. वन विभाकडून यावर लगेच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, आता याप्रकरणी वन खात्याने गुन्हा दाखल केला आहे.

वन विभागाने आमदार संजय गायकवाड यांच्याकडील कथित वाघ दंत ताव्यात घेतला असून तो न्याय वैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. न्याय वैद्यक प्रयोग शाळेतून अहवाल आल्यावर आमदार संजय गायकवाड यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार

पुलिस ने पकड़ी 17 लाख की 350 पेटी अवैध शराब : आरोपी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: …

करोड़ों कें हवाला कांड में हाई वोल्टेज ड्रामा: SP का निलंबन आदेश

करोड़ों कें हवाला कांड में हाई वोल्टेज ड्रामा:SP का निलंबन आदेश   टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *