Breaking News

संजय राऊतांना आवडतो पाकिस्तान : नेहमी टोमणे

विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. काही मतदारसंघ वगळता शांततेत आणि सुरळीत मतदान पार पडले. मात्र,कृषी मंत्री धनजंय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर गावातील काही मतदान केंद्रावर चांगलाच राड झाल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडेंच्या गुंडांनी लोकशाहीला पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने मतदान यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप विरोधकांनी केला. येथील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनीही मुंडेंवर आरोप करत मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याचे म्हटले होते. परळी मतदारसंघातील या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले. या व्हिडिओवर समाजमाध्यमांतून टीकाही झाल्याचं आपण पाहिल. आता, निवडणूक निकालानंतर शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन परळीतील मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची तुलना थेट पाकिस्तानशी केली आहे.

 

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, राज्यात महायुतीला तब्बल 237 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धनजंय मुंडे परळी मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. जवळपास दीड लाखांपर्यंतचं मताधिक्य त्यांना मिळालं आहे. मात्र, परळीतील काही मतदान केंद्रांवर बोगस व दमदाटी करुन मतदान झाल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता, संजय राऊत यांनी त्यापैकीच एक व्हिडिओ ट्विट करत अशी निवडणूक पाकिस्तान आणि अफगानिस्तानातही होत नसेल, असे म्हटले आहे. लोकशाहीतील विचलित करणारे हे दृश्य आहे परळी मतदार संघातील आहे. अशा प्रकारच्या निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होत नसतील. मतदाराना केंद्रावर येऊच दिले नाही, दहशत माजवून पळवून लावले. निवडणूक आयोग जिवंत आहे काय?, असा सवाल संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना विचारला आहे. मात्र, हा व्हिडिओ परळीतील नेमका कुठला आहे, नेमकं काय घडलं होतं ते पाहावे लागेल.

About विश्व भारत

Check Also

प्रकाश भालेराव यांची भाजपच्या ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता सेलच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती

दिं- ४/१०/२५ शणीवार ला,* *माहाळ्गीनगर- बेसा रोड येथे दीपलक्ष्मी* *सभाग्रह येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा …

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक

ग्राम प्रधान पुत्र प्रकाश भालेराव BJP वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ संयोजक टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *