Breaking News

नागपुरातील बँकेत शिरला नाग : कर्मचाऱ्यांमध्ये भीती

नागपूर शहरातील मनीष नगरच्या एसबीआय बँकेत विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. रात्री सर्व अधिकारी, कर्मचारी घरी गेले, तेव्हा बँकेत नाग वगैरे असेल याची जराही कल्पना त्यांना नव्हती. त्यानंतर आज सकाळी सर्व कर्मचारी बँकेत आले असता आल्याआल्या त्यांना नागाचे दर्शन झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शेवटी दोन सर्पमित्रांनी त्या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

 

साप, नाग निघण्याचे प्रमाण अलीकडे मोकाट प्लॉट, नदी नाले, झुडपी क्षेत्र, नवीन लोकवस्ती असलेल्या भागात अत्याधिक वाढ़ले आहेत. हेल्प फॉर एनिमल वेलफेयर असोसिएशन नागपुर द्वारे दररोज अनेक सांपाना निसर्गाच्या सानिध्यात सोडले जात आहेत.

 

रात्रीच्या सुमारास मनीष नगरातील एसबीआय बँकेत दोन फूट लांबीचा नाग शिरला होता. नियमित प्रमाणे सकाळी बँकेतील कर्मचारी हरीश सोलंकी यांनी बँक उघडताच कॅबिन मध्ये त्यांना साप दिसला. हे बघुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. लोकांची गर्दी झाली. या घटनेची माहिती बँकेतील कर्मचारी हरीश यानी हेल्फ फॉर ऍनिमल वेलफेयर असोसिएशनला दिली.

 

ही माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र आशिष राहेकवाड आणि निलेश रामटेके यांनी घटनास्थळकड़े धाव घेतली. सर्पमित्र पोहचेपर्यंत नाग ऑफिसच्या खुर्चीखाली जाऊंन बसला होता, हा नाग अंदाजे दोन ते अडीच फुट लांब असुन नाग जातीचा विषारी साप होता., या नागाला सुखरूप पकडून बैंक कर्मचारी अधिकारी यांच्या मनातील भीती अंधश्रद्धा दूर सारुन लगेच सापाला जंगलात सोडून दिले गेले.

 

सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी…

शेतात काम करत असतांना पायात लॉंग बुटचा वापर करावा, घराच्या परिसरात अथवा कम्पाउंड मध्ये असलेल्या बिनकामाच्या वस्तूंची विल्हेवाट लावावी. परिसरात स्वछता बाळगावी. घरासभोवताल असलेली अनावश्यक वेली, झुडपे काढून टाकावी. ड्रेनेज पाईपला जाळी बसवावी, जमिनीवर झोपत असतांना घराच्या दरवाजाच्या खालील फटीत कपडे लावावी. रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडत असतांना टॉर्च चा वापर करावा, शुज जमीनीवर न ठेवता ऊंचावर ठेवावे. सांपाबद्दल अनुभव नसल्यास साप हाताळण्याचा प्रयत्न करू नये, असे केल्यास जीव गमवावा लागू शकतो, असे हेल्प फॉर एनिमल वेलफेयर असोसिएशनचे स्वप्नील बोधाने यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त

धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर ड्रैगन पैलेस क्षेत्र में व्यापक बंदोबस्त टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के जन्मदिन पर सेवा पखवाड़ा आयोजित टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *