नवी दिल्ली : कोरोना परिस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरुन यूजीसीने सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन (UGC) ने एक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ऑफलाइन आणि ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने राज्यात वाढत चालेली कोरोनाची परिस्थिती पाहता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. यामध्ये राज्य सरकारने व्यवसायिक आणि गैर-व्यवसायिक कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. या निर्णयामुळे भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. एवढंच नाहीतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी याबद्दल परीक्षा घेण्याबद्दल पत्रही लिहिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांशी चर्चा करून निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली होती. आता राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
Check Also
नागपुरातील बारूद कंपनीत स्फाेट : कामगारांचा जागीच मृत्यू
नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …
१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द
महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …