मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल?
बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल!
***
काल सायंकाळी मी ज्योतिषाकडे गेलो.
ते म्हणाले, ‘‘बाळा तू खूप शिकणार आहेस़’’
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळेना़ मग तो काय म्हणाला,‘‘बाळा, हसतोस काय? काय झालं काय?’’
.
.
.
मी बोललो,‘‘काका,मी खूप शिकणार हे खरंय; पण पास कधी होणार ते सांगा की…’’
***
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
रमाकाकू : हे घे …हाजमोला.
.
.
.
भिकारी : साहेब, एखादा रुपया तरी द्या .
साहेब : उद्या ये.
.
.
.
भिकारी : च्यायला, उद्या उद्या म्हणता, या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!
***
दिन्याची बे्रकिंग न्यूज अशी होती, जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक व्हाट्सप वर टाकू नये. त्यामुळे जे कधी कुठे जात नाही ते घरातून बाहेर होतात.
***
मुंबईकर : तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेरीकर: आम्ही कूलरसमोर बसतो!
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर…
पुणेकर : मग आम्ही कूलर चालू करतो…
***