*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल चा पुढाकार*
मूल (३ नोव्हेबर २०२०): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ,डॉकटर सेल चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका मूलच्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये काम करणाऱ्या कोरोना योध्याना संरक्षण होण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून “फेस शिल्ड” वैद्यकीय अधिकारी डॉ रंजना झाडे यांचेकडे सुपूर्द करून कोरोना काळात जीव धोक्यात टाकून काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त केले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मंगेश पोटवार, तालुकाध्यक्ष गंगाधर कुणघाडकर सर, समता परिषदचे जिल्हाद्यक्ष प्रा. विजय लोनबले, युवा पदाधिकारी सोनल मडावी, महिला तालुकाध्यक्ष सौ. नीता पुणेश्वर गेडाम, तालुका उपाध्यक्ष विकास गेडाम, पुणेश्वर गेडाम सह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते