Breaking News

आबीद शेख हत्त्या प्रकरणी कुख्यात गुंड देवा नौकरकार याला गडचिरोली वरून अटक.

Advertisements
मृतक आबीद शेख यांच्या पत्नीने आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टम करणार नसल्याचा दिला होता इशारा.
अवैध धंद्याला प्रशासनाचे खतपाणी.
          वरोरा- वरोरा शहरात घडलेल्या बहुचर्चित बंदुकीच्या सहाय्याने गोळ्या झाडून आबीद शेख हत्त्या प्रकरणातील मुख्य आरोपी देवा नौकरकार हा कालपासून फरार होता पण आज आबीद शेख यांच्या पत्नीने जोपर्यंत मुख्य आरोपींना पकडणार नाही तोपर्यंत माझ्या पतीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करायचे नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीसांची पुरती गोची झाली त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या माध्यमातून कुख्यात गुंड व आबीद शेख याचा हत्त्यारा देवा नौकरकार याला त्वरित पकडण्याचे फर्मान सुटल्याने वरोरा येथे पोलीस निरीक्षक राहिलेले ऊमेश पाटील सध्या  जे आता बल्लारपूर येथे कार्यरत आहे त्यांच्या पथकांनी देवा नौकरकार याला गडचिरोली येथून नुकतीच आज १६मे ला अटक करून वरोरा येथे आणण्यात येत आहे..
कुख्यात आरोपी देवा नौकरकार हा आपली गैंग बनवून अवैध दारूचा व्यवसाय सट्टापट्टी व गांजा विक्री या व्यवसायात असायचा .देवावर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये व इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. खरं तर याला पोलिस प्रशासनाने तडीपार करायला हवे होते पण त्याने मानसिक संतुलन बिघडल्याचे नाटक करून अनेकदा त्यांनी पोलीस प्रशासनाला चकमा देऊन स्वतःला अटकेपासुन व तडीपार पासुन वाचवले आहे. अनेक वर्षांपासून  मृतक  आबीद शेख व देवा नौकरकार यांची दोस्ती होती व दोघेही मिळून अवैध व्यवसाय करायचे पण आता राजकीय नेत्यांच्या व पोलिस प्रशासन  यांच्या क्रूपेने देवा नौकरकार  याचा धंदा वाढला होता व दोन मित्रामध्ये  पैशांच्या वादावरून शेख आबीद शेख यांच्यासोबत वैर झाले होते एवढेच नव्हे तर देवा हा आबीदला ठार मारण्याच्या सतत  धमक्या देत होता व त्याच्या वडिलाला सुद्धा तुझ्या मुलाला मी ठार करतो म्हणून धमकी द्यायचा .आणि त्याने अवैध पद्धतीने सहा माऊजर विकत घेवून शेख  आबीद शेख याला ठार मारण्याचा कट रचत होता आणि काल त्याने अखेर डाव साधला आणि आबीद शेख याचा खून केला.
    वरोरा शहरात अवैध दारू विक्रेते  व सट्टेबाजी चे स्तोम माजले असून त्याकडे पोलिस प्रशासनाने आर्थिक मोबदल्यासाठी दुर्लक्ष केले आहे. शांत असलेले वरोरा शहर अवैध व्यवसायाचे माहेरघर बनले आहे. एकाच आठवड्यात आणि त्यातही चार दिवसांत दोन खुन ही पोलिस प्रशासनाच्या द्रुष्टीने शरमेची बाब आहे अशा प्रतिक्रिया शहरात ऊमटलेल्या आहे. याशिवाय अवैध रेती तस्कर वाढत जात असल्याने  एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जीव जाऊ शकतो.अशावेळी अवैध रेती तस्कराना प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपुरात वकील महिलेने मागितली लाखांची खंडणी

कार्यालयात देहव्यापाराचा अड्डा सुरू केल्याप्रकरणी ‘लॉकअप’मध्ये बंद असलेल्या आरोपीच्या पत्नीकडून तोतया महिला वकिलाने वरिष्ठ पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *