Breaking News

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेची कार्यकारिणी जाहीर
चंद्रपूर :
वैदर्भीय साहित्यक्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या चंद्रपूर येथील गोंडवन शाखेची सन २०२१- २०२६ करिता शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. वि.सा.संघाचे केंद्रीय प्रतिनिधी व शाखा समन्वयक डॉ.श्याम मोहरकर यांनी ही कार्यकारिणी आज जाहीर केली. प्रख्यात स्फुटलेखक, शल्यविशारद डॉ.शरदचंद्र सालफळे यांची शाखाध्यक्ष म्हणून आणि युवा कवी इरफान शेख यांची सचिव म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.
प्रसिद्ध कवी व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी यांची कार्याध्यक्ष तर कवयित्री डॉ.पद्मरेखा धनकर तसेच कवी डॉ.धनराज खानोरकर हे उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील. यंदा कार्यकारिणीत कवी प्रदीप देशमुख (साहित्य) आणि सुनील बावणे (सांस्कृतिक) सहसचिव तर समीक्षक डॉ.राज मुसने कोषाध्यक्ष असतील. कवी अविनाश पोइनकर (प्रसार माध्यमे) आणि स्वप्नील मेश्राम (ग्राफीक्स) प्रसिद्धी प्रमुख तर डॉ. पल्लवी इंगळे, प्रा.नरेंद्र टिकले, संध्या विरमलवार, किशोर जामदार, मो.बा.देशपांडे, डॉ.परमानंद बावनकुळे, गीता रायपुरे, श्रीकांत साव कार्यकारी सदस्य असतील.
साहित्य समितीचे गोपाल शिरपूरकर, सांस्कृतिक समितीच्या डॉ. प्रेरणा कोलते आणि स्पर्धा परीक्षा समितीचे प्रा.श्याम धोपटे प्रमुख म्हणून काम पाहतील. माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, प्रसिद्ध विधिज्ञ विजय मोगरे, प्रसिद्ध हृद्यरोगतज्ञ डॉ.अशोक वासलवार आणि शिक्षणतज्ज्ञ विजय बदखल मार्गदर्शक असतील. निवड झालेल्या सर्वांचे शहरातल्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *