Breaking News

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार
   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन

चंद्रपूर,
महाविकास आघाडी सरकारने एका पाठोपाठ एक असे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण आणि अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु, तीनही आरक्षणांबद्दल न्यायालयांमध्ये यथायोग्य बाजू न मांडल्याने ही सर्व आरक्षणे न्यायालयांनी रद्द केली. ही या सरकारची संवेदनहीनता आहे व आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहेे.

चंद्रपूर जिल्हा भाजपातर्फे शनिवारी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी पडोळी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. गाव स्वावलंबी व्हावे व सर्व समाजाचा सारखा विकास व्हावा याकरिता ही सर्व आरक्षण प्रणाली लागू झाली होती. परंतु, शासन या सर्व व्यवस्था मोडीत काढायला निघाल्या आहेत असे दिसते, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

19 जुलैला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या ओबीसी जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणूकांमध्ये भाजपा महाराष्ट्र सर्व जागी ओबीसी उमेदवारच उभे करेल व यादृष्टीने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माळी समाजाचे बबन वानखेडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, महानगर महासचिव राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, विनोद शेरकी, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, प्रज्ञा गंधेवार, प्रभा गुडधे, विशाल निंबाळकर, तुषार सोम, प्रदीप किरमे, देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, राहूल घोटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी जोरदार घोषणा देत महाआघाडी सरकारचा निषेध केला.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *