विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील सर्व विभागांतील वर्ग-तीन मधील लिपिकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी)भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विविध विभागाच्या भरती प्रक्रियेत संबंधित विभागाकडून लिपिकाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता आयोगामार्फत लिपिक भरती होणार. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिक्त पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत असे ठरले.
विश्वभारत News Website