Breaking News

मान्सून २४ पर्यंत! विदर्भातून माघार, मराठवाड्यात येलो अलर्ट

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला. मात्र, तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisements

मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. यात बुलढाणा, ब्रह्मपुरी या ठिकाणाहून त्याने प्रस्थान केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मात्र, कोकण व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे.

Advertisements

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्रातही वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आगामी तीन दिवस जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट (18-20 ऑक्टोबर) मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा.

यलो अलर्ट (17-19 ऑक्टोबर) पुणे (17), कोल्हापूर (17), सातारा (17), सांगली (18 व 19), पालघर
(17), ठाणे (17), नगर (17 व 18), पुणे (17), औरंगाबाद (18, 19), जालना (18), परभणी (17 व 18), बीड (17 ते
19), हिंगोली (19), नांदेड (17 ते 19), लातूर (17 ते 19), उस्मानाबाद (17 ते 19), वाशिम (18), यवतमाळ (18)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये …

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *