Breaking News

जीवन क्षणभंगूर : कार चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका

Advertisements

स्वतःच्या चारचाकी वाहनाने एकटेच बुलढाणा, जळगाव जामोदकडे निघाले असता वाटेतच हृदयघातरुपी काळाने ‘त्यांना’ गाठले.दुखणे असह्य असतानाही त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांना ही बाब कळविली. मात्र, कुणीही मदतीला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

Advertisements

जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू एखाद्याला कसा खिंडीत गाठतो, याचे हे हृदयद्रावक उदाहरण. सोमवारी सकाळी स्थानिक महात्मा फुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मानकर (६५) आपल्या मोटारीने जळगाव जामोदकडे जात होते. शेम्बा गावानजीक कार चालवत असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यांनी याबाबत तत्काळ नातेवाईकांना कळविले. मात्र काही मिनिटातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisements

शिवाजी संस्थेतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्राशी जुळलेली नाळ कायम राखण्यासाठी स्वतः शाळा सुरू केली. स्थानिक शिवस्मारक समितीचे सचिव म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने महात्मा फुले शाळा परिवाराचा आधारवड कोसळला आहे. बुलढाण्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *