माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच नागपूरचा दौरा करणार असल्याचे कळते. “सध्या उच्च न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या काटोल मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
शिंदे, फडणवीसांची घेणार भेट
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकासकामांसदर्भात पत्र लिहिले होते. हे पत्र नागपूर, विदर्भातील समस्यांबाबत होते. आता मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. भेट घेऊन विकासकामांना कशी गती देता येईल, यावर चर्चा करणार आहे. विकासकामांबाबत ही भेट असेल,” असेही देशमुख यांनी सांगितले.