Breaking News

महिला आमदारावर हल्ला

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे.

प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर झालेला हा हल्ला एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे. समोर येऊन वार करा असे भ्याडपणे मागून हल्ला करु नका” अशा शब्दात प्रज्ञा सातव यांनी या हल्ल्याचा निषेध केला. त्यामुळे आमदार सुरक्षित नाहीत, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

About विश्व भारत

Check Also

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस 

सेक्स पावर बढाने जंगली सुंअर के नाम पर बिक रहा देशी सुंअर का मांस   …

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई 

कुत्ते के काटने पर कुत्ते के मालिक की जमकर पिटाई   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *