Breaking News

एकमेकांना फुल नका देऊ : ‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी गायीला द्या मिठी

Advertisements

फेब्रुवारीत चाहूल लागतेय ती प्रेमाची, ओढ अशी वाढते की हा महिना असाच कायम असावा. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार असतो. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस अर्थात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केले जाते.

Advertisements

मिठी मारा

Advertisements

केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं आहे.

सर्व गाईप्रेमींनी गाईचे महत्त्व लक्षात घेऊन 14 फेब्रुवारी हा दिवस गायींना मिठी मारून साजरा करावा, यामुळे जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होईलं. गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या जीवनाचा आधार आहे. गाय पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. तिला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखलं जातं, असं पशु कल्याण मंडळाने त्यांच्या आवाहन पत्रकात म्हटलं आहे.

गाईचे जतन केल्यानं ‘पाश्चात्य संस्कृतीच्या’ प्रगतीमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वैदिक परंपरांचे जतन करण्यात मदत होईल, असं मंडळानं म्हटलं आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपण आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरलो आहोत. म्हणून, सर्व गोप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईला मिठी मारुन साजरा करावा, असं ही या पत्रकात नमूद आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *