राज्यातील 20-25 अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवडाभरात केल्या जाणार आहेत. विविध टप्प्यांत या बदल्या जाहीर केल्या जातील. या बदल्यांमध्ये मंत्रालयाव्यतिरिक्त इतरही काही बदल्या केल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय पोलिस दलात महत्त्वपूर्ण फेरबदलही केले जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहनिर्माण विभागात या बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील बदल्या जाहीर केल्यानंतर लवकरच जवळपास २० ते २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
विश्वभारत News Website