Breaking News

राज्यातील काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे उपचारादरम्यान निधन

Advertisements

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज (मंगळवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

Advertisements

मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. यासाठी ते नियमित उपचार करीत होते. प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. आज मंगळवारी पहाटे दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडत असतानाच कौटुंबिक दुःखद घटना घडली. त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाल्याने अस्वस्थ झाले होते. पोटाच्या आजाराने त्यांची प्रकृती बिघडली होती. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका, काँग्रेस मधील गटातटाचे राजकारण यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. तसेच पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना चौकशीसाठी ईडीची नोटीस आलेली होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *