Breaking News

यवतमाळमध्ये 150 हून अधिक नागरिक पुरात अडकले : दोन हेलिकॉप्टर तैनात

Advertisements

यवतमाळसह १४ तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपले. यवतमाळसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी तर महागाव तालुक्यात १३१ मिमी अशी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.

Advertisements

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यात दोन घरे वाहून गेली आहेत. येथे सुमारे ४५ नागरिक पुरात अडकले असून, त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून दोन हेलीकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील. मदनभाऊ येरावार यांच्या आम्ही संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.

Advertisements

यवतमाळ शहरातील गोदामफैल, वडगाव, लोहारा, वाघापूर आदी सखल भागातही पावसाचे पाणी शिरले आहे. झरी जामणी तालुक्यातील दिग्रस येथे पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असून, महाराष्ट्र-तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अकोलाबाजार येथे नदीचा बांध फुटून पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार माजला आहे. महागाव तालुक्यातील धनोडा ते माहूर येथील पैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *