भाजपच्या व्यापार सेलच्या संयोजकपदी नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रसिद्ध बिल्डर वीरेंद्र कुकरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री कुकरेजा यांच्या नावाची घोषणा केली. कुकरेजा यांच्या नियुक्तीमुळे भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
