Breaking News

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ग्राहकांना पाठवणार चॉकलेट, कारण काय?

Advertisements

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा हप्ता (ईएमआय) थकवू नका. बँकेचा हप्ता थकवला तर बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. जे ग्राहक बँकेचे हप्ते थकवतात किंवा एखादा हप्ता चुकवू शकतात अशा ग्राहकांसाठी बँकेने एक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे बँक ग्राहकांना थकलेला हप्ता भरण्याची आठवण करून देईल.

Advertisements

बँकेला जर वाटलं की एखादा ग्राहक वेळेवर पेमेंट करणार नाही तर बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवेल. बँकेने म्हटलं आहे की जो ग्राहक वेळेवर ईएमआय भरणार नसतो तो बँकेचे रिमाईंडर कॉल्स घेत नाही. त्यावरून आम्हाला अंदाज येतो की हा ग्राहक यावेळी वेळेवर हप्ता भरणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना बँक त्याच्या घरी चॉकलेट पाठवून त्याला हप्ता भरण्याची आठवण करून देईल.

Advertisements

बँकिंग क्षेत्रात अलिकडच्या काळात किरकोळ कर्जात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मासिक ईएमआयमध्ये डिफॉल्टची प्रकरणंही वाढली आहेत. त्यामुळे अनेक बँका कर्जाच्या, ईएमआयच्या परतफेडीसाठी वेगवेगळे उपाय अवलंबू लागल्या आहेत. एसबीआयची ही चॉकलेट योजना कर्जाच्या वसुलीत उपयोगी पडेल असं बँकेला वाटतंय.

एसबीआयची किरकोळ कर्जे जून २०२३ च्या तिमाहीत १२,०४,२७९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहेत. जून २०२२ च्या तिमाहीत बँकेची किरकोळ कर्जे १०,३४,१११ कोटी रुपये इतकी होती. बँकेच्या किरकोळ कर्जात यंदा १६.४६ टक्के वाढ झाली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘व्हाट्सअँप’द्वारे मिळणार १० लाखांचं कर्ज : फक्त मेसेज करा, मोबाईल क्रमांक जाणून घ्या…!

गरजूला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या …

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *