Breaking News

असंख्य कृष्ण भक्त दुखावले : मनेका गांधी अडचणीत,’ISKCON’कडून १०० कोटींची मानहानीची नोटीस

Advertisements

खासदार मनेका गांधी या इस्कॉन प्रकरणी केलेल्या विधानावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. मनेका यांनी जगप्रसिद्ध इस्कॉन संस्थेवर कसाईंना गायी विकल्याचा आरोप केला होता, याची गंभीर दखल घेत ISKCON च्या कोलकाता युनिटने मनेका गांधी यांच्या विरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भाजप खासदार मनेका यांना नोटीस बजावण्यात आल्याचेही इस्कॉनच्या कोलकाता युनिटने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘एएनआय‘ने दिले आहे.

Advertisements

मनेका गांधींविषयी भाजप आमदाराचे आक्षेपार्ह विधान
याप्रकरणी माहिती देताना, कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी म्हटले आहे की, मेनका गांधी यांची टिप्पणी अत्यंत दुर्दैवी होती. त्यांच्या निराधार आणि खोट्या आरोपामुळे जगभरातील आमचे भक्त दुखावले आहेत. आम्ही त्यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांच्या मानहानीची कायदेशीर कारवाई करत आहोत. आम्ही त्यांना आज नोटीस पाठवली असल्याचेही दास यांनी एएनआयला सांगितले.

Advertisements

माजी मंत्री आणि भाजपच्या खासदार मनेका गांधी यांचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच समोर आला. ज्यामध्ये पीपल फॉर एनिमल्सच्या संस्थापक खासदार मनेका गांधी ‘इस्कॉन ही देशातील सर्वात मोठा फसवणूक करणारी संस्था असून, ती आपल्या गो-शाळांमधून कसाईंना गायी विकते’ असा गंभीर आरोप करतान दिसत आहेत. गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना, कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारामन दास म्हणाले, एक खासदार, एके काळी केंद्रीय मंत्री होत्या, त्या एवढ्या मोठ्या संस्थेविरुद्ध पुराव्याशिवाय खोटे आरोप कसे काय करू शकतात? त्या कथित व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की, त्यांनी आमच्या अनंतपूर गोशाळेला भेट दिली, पण आमच्या भक्तांना (इस्कॉन) त्यांची याठिकाणची कोणतीही भेट आठवत नसल्याचा नवीन दावा दास यांनी केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए देवी-देवताओं के वैदिक और अमोघ मंत्र शक्तियों का चमत्कार

जानिए देवी-देवताओं के वैदिक और अमोघ मंत्र शक्तियों का चमत्कार टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट …

(भाग:106) नैसर्गिक नियमों का पालन एवं धर्म की रक्षा करते हुए जीवन यापन करना ही संपूर्ण गीता सार है।

(भाग:106) नैसर्गिक नियमों का पालन एवं धर्म की रक्षा करते हुए जीवन यापन करना ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *