Breaking News

शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याची सीबीआय चौकशी : गंभीर आरोप

जालना येथील आंतरवली सराटी या गावात पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्लॅन शरद पवार गटाचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश टोपे यांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणीही प्रतिष्ठाणकडून करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिस व आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीवरुन अवघे राज्य ढवळून निघाले होते. पोलिसांनी आंदोलकांवर अमानूष लाठीमार केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तर, आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीमार केला, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने या घटनेवरुन राजेश टोपेंवर गंभीर आरोप केले आहेत.

आधीपासूनच रचला कट

देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी आरोप केला आहे की, पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता. आंदोलनात गरबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे राजेश टोपे आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता. याबाबत प्रतिष्ठानकडून जालना पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले आहे.

बाहेरुन समाजकंटक आणले

पोलिसांना दिलेल्या निवेदनात देवेंद्र फडणीस प्रतिष्ठानने म्हटले आहे की, 1 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण चालू होते. तेथे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या पोलिस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते. हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, शहागड व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असून, या समाजकंटकांनी पोलिस बांधवावर घरावरती जाऊन दगडफेक केली. दगडफेक केल्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलीस बांधवाना लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करावा लागला.

राजेश टोपेंनी घेतली होती गुप्त बैठक

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 27 ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत मराठा समाज बांधवाच्या उपोषाणामध्ये काही गडबड झाली तर पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. त्यामुळे, आमदार राजेश टोपे व त्यांचे स्वीय सहाय्यक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिस व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी.

About विश्व भारत

Check Also

विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : नागपुरात पावसाचा जोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये …

BJP आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

भाजपचे विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *