मान्सूनचा पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून राज्यातून मान्सून पूर्णपणे बाहेर पडलाय. यंदा राज्यात कमी राहिला आहे. महाराष्ट्रात उशिरा येणा्ऱ्या मान्सूनने राज्यावर कमी कृपा दाखवली. साधरण जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी बसरला.
त्यानंतर जुलै महिन्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात २१ दिवस वरुणराजाने दांडी मारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काहीसा बरा पाऊस झाला परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यामधील सरासरी पावसाची तुट भरुन काढली नाही. यामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. उकाडा खूप वाढत असून नागरिकांनी कुलरचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे.
परतीच्या प्रवासावर असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे आज देशाच्या बऱ्याच भागातून परतले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागातून मान्सून बाहेर पडलाय. परंतु कोकण आणि विदर्भातील काही भागातून अद्याप मान्सून परतलेला नाही. मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण असल्यानं लवकरच संपूर्ण देशातून नैर्ऋत्य मोसमी वारे बाहेर पडतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय.
परतीचा प्रवास सुरू मान्सूनला विलंब लागला. सप्टेंबरच्या २५ तारखेपासून मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या प्रवासासाठी मान्सून उशिर करत आहे. दरम्यान मान्सूनच्या परतीची सर्वसाधारण तारीख पाहता १० ऑक्टोबरपर्यंत तो राज्याच्या बहुतांश भागातून बाहेर पडत असतो. महाराष्ट्रासह मान्सूनने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांसह महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून निरोप घेतला आहे.
कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय. महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय. शनिवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनचे नैर्ऋत्य वारे माघार घेतील. राज्यातून मान्सून परतल्यामुळे ऑक्टोंबर हिट जाणवू लागलीय. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढले आहे. दरम्यान राज्यात सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही.
विश्वभारत News Website