Breaking News

इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत

Advertisements

मध्यप्रदेश सह 5 राज्यात निवडणूक तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी रेल्वेने इंदूर ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत केला. ही गाडी सोमवारी दुपारी अडीच वाजता नागपुरात आली आणि दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी इंदूरकडे रवाना झाली.मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची सोमवारी घोषणा झाली. त्यापूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रेल्वेने अतिशय वेगाने निर्णय घेऊन वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेडा दाखून उदघाटन करतात. पण नागपूरसारख्या महत्वाच्या शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊन ही कोणताही सोहळा आयोजित करण्यात आला नाही. कारण, ही गाडी सुरू होईल, याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत कल्पना नव्हती.

Advertisements

२०९११ आणि २०९१२ इंदूर-भोपाळ वंदेभारत एक्स्प्रेस वंदेभारत एक्सप्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत करण्याची अधिसूचना रविवारी सायंकाळी काढण्यात आली. ही गाडी इंदूर येथून सकाळी ६.१० वाजता निघेल. दुपारी अडीच वाजता नागपुरात येईल. ही गाडी उज्जैनला सकाळी ७ वाजता, भोपाळ सव्वानऊ वाजता, इटारसी येथे पावणे अकरा वाजता येईल. तर नागपूर ते इंदूर वंदेभारत एक्सप्रेस नागपूर येथून दुपारी ३.२० वाजता निघेल. रात्री पावणे बारा वाजता इंदूर येथे पोहोचेल.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *