Breaking News

राज ठाकरेंना अटक करा : कोणी केली मागणी?

Advertisements

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘टोल नाका जाळण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंना तातडीने अटक करा’ अशी लेखी तक्रार त्यांनी केली आहे.

Advertisements

तसंच मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

Advertisements

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ”हिंदूराष्ट्र भारत हमारा असं मानणारं आमचं संघटन आहे. मराठी गुजराती तमिळ तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र, मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे. पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात.”

ते म्हणाले, ”महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही डंके की चोट पे सांगत आहोत की, काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी आज पत्रकार परिषद घेऊन, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असा इशारा होता. यानंतर राज्य अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर आंदोलन केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *