पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं.
अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे दादांचं स्वप्न असलेल्या मुख्यमंत्रीपदावरुनच पवारांनी निशाणा साधला आहे.
अजित पवार गटानं शरद पवारांवर वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली. पवारांनी प्रत्युत्तर दिलं नाही.. निवडणूक आयोगासमोर पवारांना हुकूमशाह म्हटलं. तरीही पवार शांत राहिले. मात्र, पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांवर बोचरी टीका केलीय.. आणि वार केलाय तो अजित पवारांच्या स्वप्नावर अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार, असं मोठं विधान शरद पवारांनी केले आहे.
सुप्रिया सुळेंची इच्छा आम्ही पूर्ण करणार, असं विधान भुजबळांनी केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं आमचं काम आहे असं म्हणत भुजबळांनी टोला लगावलाय. तर, सुप्रिया सुळेंचं हे स्वप्नच राहणार, असा टोला शरद पवारांनी लगावला.
विश्वभारत News Website