Breaking News

नग्न झाल्यावर चित्रपटात मिळतंय काम? अभिनेत्री काय म्हणते

Advertisements

मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींना त्यांचं वय आणि कपड्यांवरून वारंवार ट्रोल केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मिताली मयेकरला देखील आला आहे. मिताली आणि सिद्धार्थ विविध देशांना भेट देऊन त्याचे फोटो व काही आठवणी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. अभिनेत्रीच्या अशाच एका फोटोवर नेटकऱ्याने नकारात्मक कमेंट केली आहे. फोटोवरची कमेंट पाहून मितालीने संबंधित ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे.

Advertisements

मिताली अलीकडेच तिच्या काही मैत्रिणींबरोबर इंडोनेशियामधील बाली हे शहर फिरायला गेली होती. इंडोनेशियामध्ये असलेल्या पिंक बीचवर अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. या फोटोला अभिनेत्रीने “पिंक बीच…” असं कॅप्शन दिलं आहे. एकीकडे मितालीच्या या फोटोशूटचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. परंतु, दुसरीकडे एका नेटकऱ्याने मितालीच्या फोटोवर विचित्र कमेंट केली आहे.

Advertisements

मितालीने शेअर केलेल्या पिंक बीचच्या फोटोवर एका नेटकऱ्याने “नागडं(नग्न) झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?” असा विचित्र प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने यावर, “माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून” असं सडेतोड उत्तर दिलं आहे. मितालीने दिलेल्या उत्तराचं तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुक केलं आहे. यापूर्वी ऐश्वर्या नारकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी देखील अशीच रोखठोक उत्तरं देत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती.

मिताली मयेकरने ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर
दरम्यान, मिताली मयेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. छोट्या पडद्यावरील ‘फ्रेशर्स’, ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने २०२१ मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर लग्न केलं. दोघेही लग्नानंतर अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपला जात असतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *