Breaking News

नागपूर : ग्रामपंचायत निवडणूक 26.81 टक्के मतदान

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत सुमारे 26.81 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणुक विभागाने दिली आहे.

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी आज (रविवार) सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारे 11.55 टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. एकंदर 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.

Advertisements

यात काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली. ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *