Breaking News

लग्नातील रसगुल्ला संपल्याने मारहाण

Advertisements

लग्न म्हटलं की अनेक मजेदार किस्से घडत असतात. लग्नाचा मेनू काय हा प्रत्येक पाहुण्यांमध्ये कुजबुजत का होईना विचारला जाणारा प्रश्न आहे. नवरा-नवरीनंतर कोणत्याही लग्नसमारंभात होणारी चर्चा मात्र मेनूबाबतच असते. उत्तर प्रदेशातील आग्रा इथे मात्र लग्नातला मेनू वऱ्हाडयांना भलताच महागात पडला आहे. लग्नाच्या जेवणातील रसगुल्ले संपले आणि झालेल्या मारामारीत 6 वऱ्हाडी जखमी झाले.

Advertisements

रविवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी झालेल्या या सहाही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजलं आहे.

Advertisements

या हाणामारीसंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. ब्रिजभान कुशवाहा यांच्या घरी असलेल्या लग्न समारंभात कुणीतरी रसगुल्ले संपल्याबाबत कमेंट केली. नेमकी हीच कमेंट या हाणामारीच कारण बनल्याच समोर येत आहे. या वादात भगवान देवी, योगेश, मनोज, कैलाश आणि धर्मेंद्र अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *