Breaking News

‘पीएम आवास योजने’मध्ये नागपूर विभाग प्रथम : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : कामठीने मारली बाजी

Advertisements

बहुचर्चित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला “महाआवास अभियान” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Advertisements

महाआवास अभियान पुरस्कार 2021-22 मध्ये पीएम आवास योजनेत राज्यातील सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून नागपूर विभागाला प्राप्त होणारा सन्मान विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी स्वीकारणार आहेत. नागपूर विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून 41.8 गुण प्राप्त झाले आहेत. तसेच 70.8 गुण मिळवून भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. तर गोंदिया जिल्हा 61.1 गुण मिळवून राज्यात तृतीय ठरला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागपूर विभागाने 2 लाख 88 हजार 48 घरे बांधण्याच्या उद्दिष्टयापैकी 2 लाख 64 हजार 71 घरकुलाचे बांधकाम (91.68 टक्के) करून उत्तम कामगिरी केली आहे .

Advertisements

पीएम आवास योजनेची नागपूर विभागाने उत्कृष्ट अंमलबजावणी करून सरस कामगिरी केली. राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच बहुमजली इमारती बांधण्याच्या श्रेणीमध्ये भंडारा जिल्ह्यातील ताडगाव (मोहाडी) राज्यात प्रथम आले आहे. सर्वोत्कृष्ट गृह संकुलांच्या श्रेणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरा (रे) राज्यात द्वितीय तर नागपूर जिल्ह्यातील बुधला (कळमेश्वर) तृतीय ठरले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *