Breaking News

सरकारी वकिलास २० हजारांची लाच घेताना अटक

Advertisements

खटला लवकर निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेऊन दुचाकीवरुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलास लाचलुचपत विभागाने पाठलाग करुन सोमवारी सांगली येथे अटक केली.

Advertisements

लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. तडजोड करुन हा खटला लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकिल सोमनाथ माळी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० हजार देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करुन सोमवारी न्यायालयाबाहेर सापळा लावला. लाचेची रक्कम घेऊन वकिलाने दुचाकीवरुन पोबारा केला. पथकाने न्यायालयापासून १ किलोमीटर अंतरावर विश्रामबागमधील राजमती गर्ल्स कॉलेजजवळ पथकाने संशयिताला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *