Breaking News

नागपुरात कोरोनाचा(JN.1) पहिला रुग्ण आढळला

Advertisements

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. केरळमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढतेय.भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. नागपुरातील धंतोली परिसरात पहिला रुग्ण आढळला आहे.(JN.1)

Advertisements

आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे रुग्ण 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 वर पोहोचले आहेत, तर देशात 5 लाख 33 हजार 316 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.(JN.1)

Advertisements

बरे होण्याचा दर?

याशिवाय कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशातील 4 कोटी 44 लाख 69 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील बरे होण्याचा दर 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकात नमूद केले आहे.तर महाराष्ट्रात अजून कुठेही रुग्ण आढळला नसल्याचे समजते.(JN.1)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। धुएं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *