Breaking News

बोंबला!नवीन वर्षात पाऊस येणार : पुन्हा शेतीचे नुकसान करणार?

Advertisements

मागील काही वर्षांपासून देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सातत्याने दिसते. पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. अशातच आता काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची हजेरीची शक्यता आहे.

Advertisements

तमिळनाडू राज्यात वर्षाच्या अखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला असे दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्लीच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisements

खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या अनेक भागांत हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये दाट धुके दिसून येत आहे. महाराष्ट्रातदेखील अनेक भागांत धुक्यांची चादर पसरलेली दिसून येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी

बे मौसम बारिश और ओलावृष्टि के कहर से किसानों के चेहरे पर छाई मायूसी टेकचंद्र …

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक उठायें लाभ

नि:शुल्क राशन के साथ फ्री में मिलेगी 10 किलो वाली कैरीबैग? राशन कार्ड धारक नागरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *