Breaking News

सलमान खानने जाळल्या वडिलांच्या 100 रुपयांच्या नोटा

Advertisements

बॉलिवूडचा भाईजान व लाडका टायगर अर्थात सलमान खान आज ५८ वा वाढदिवस साजरा केला. यावर्षी ‘टायगर ३’च्या मध्यमातून जबरदस्त कमबॅक करत सलमानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तीन दशकांहून अधिक काळ सलमान चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आज देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी सलमान खान हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आज सलमान २९१२ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. पण एकेकाळी त्यानेही आपल्या वडिलांकडून बेदम मार खाल्ला होता.

Advertisements

लहानपणी सलमान प्रचंड मस्तीखोर होता अन् यासाठीच नंतर सलीम खान यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी बोर्डिंगला पाठवायचा निर्णय घेतला. सलमानने एकदा लहान असताना वडील सलीम खान यांच्या एका महिन्याच्या संपूर्ण पगाराला अक्षरशः आगच लावली होती. एका मुलाखतीमध्ये खुद्द सलमाननेच हा किस्सा सांगितला होता. त्यावेळी सलीम खान यांची आर्थिक स्थिति फारशी चांगली नव्हती, पैसे फारसे मिळत नव्हते अन् अशातच सलमानने असा प्रकार केल्याने त्यांनी त्याला चांगलंच फटकारलं अन् उन्हात उभं केलं होतं.

Advertisements

एकेदिवशी सकाळी उठून लहान सलमान आणि अरबाजला आपल्या वडिलांबरोबर बाहेर त्यांच्या मित्राकडे जायचे होते. त्यावेळी सलमानला आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितिबद्दल जाणीव होती. तरी त्यांने आपल्या वडिलांचा एक महिन्याचा पगार अक्षरशः जाळला. अन् हे कळताच सलीम खान यांनी सलमानला तेव्हा चांगलाच चोप दिला होता.

त्याविषयी बोलताना एका जुन्या मुलाखतीमध्ये सलमान म्हणाला, “मी लहान होतो आणि प्रचंड खोडकर होतो. मी बाबांचा जवळपास संपूर्ण महिन्याचा पगार जाळला होता. मी तेव्हा शंभरच्या सात नोटांना आग लावून जाळल्या होत्या. हा अत्यंत मूर्खपणा होता, अन् त्यासाठी मला बाबांनी चांगलंच मारलं होता, त्यासाठी मी त्यांना दोष देणार नाही.” असे अनेक किस्स सलमानचे आपल्याला ठाऊक आहेत.

एवढं होऊनसुद्धा कधीच सलमान आणि सलीम खान यांच्यात दुरावा निर्माण झाला नाही. आपल्या वडिलांबद्दल सलमानच्या मनात कायम आदर असतो अन् तो प्रत्येकवेळी पाहायलाही मिळतो. नुकतंच सलीम खान यांच्या थोरल्या मुलाने म्हणजेच अरबाज खानने दुसरं लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या लग्नात संपूर्ण खान कुटुंबीय हजर होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे IPL स्टार अभिषेक शर्मा

मशहूर मॉडल की आत्महत्या केस में बुरे फंसे आईपीएल स्टार अभिषेक शर्मा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत IAS अधिकारी : घटस्फोटाची चर्चा

‘महाभारत’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *