Breaking News

पत्रकारांसोबत बिनसले आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली : मुख्यमंत्र्यांवरही आली होती आफत

Advertisements

बऱ्या आणि चुकीच्या अशा दोन्ही घटनांमुळे सतत चर्चेत असणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बुधवारी बदली झाली.अमोल येडगे हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.

Advertisements

अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे.

Advertisements

जिल्हाधिकारी रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.करोना संसर्ग काळात आंदोलकर्त्यां भाजपच्या पदाधिकार्‍यांना वेठीस ठेवल्याने त्यांनी रेखावर यांच्या बदलीची मागणी केली होती. पत्रकारांशी त्यांचे अनेकदा बिनसले होते.

मुख्यमंत्र्यांवर आफत

यामुळे एकदा तर पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामुळे आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्यालय सोडून बाहेर पत्रकारांशी संवाद साधने भाग पडले होते. या ना त्या कारणामुळे त्यांनी सतेज पाटील, दीपक केसरकर, हसन मुश्रीफ या पालकमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले जाते

कौतुकाचे धनी

दरम्यान अलीकडेच राहुल रेखावार यांनी अमेरिकन बंगलो हा ५७ एकराचा भूखंड प्रकरणी दिलेला निकाल हा कौतुकाचा विषय ठरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या या मध्यवर्ती ठिकाणच्या भूखंडावर बड्या राजकीय नेत्यांचा डोळा होता. त्यावरून मोठा राजकीय दबावही होता. तरीही त्यांनी कशाची फिकीर न करता भूखंड शासन जमा करण्याचा दिलेला निर्णय ऐतिहासिक तितकाच महत्त्वाचा ठरल्याने त्यांचे कौतुक झाले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *